जम्मूतील अरनिया सेक्टरमध्ये एका पाकिस्तानीला अटक
श्रीनगर
जम्मूमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शनिवारी सकाळी आंतरराष्ट्रीय सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली. कारवाईदरम्यान गोळीबारही करावा लागल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. पकडण्यात आलेल्या घुसखोराचे नाव मोहम्मद शबद (45) असे असून तो सियालकोटचा रहिवासी आहे. सीमेपलीकडून अरनिया सेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अटक करण्यात आली. त्याची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी बीएसएफने तस्करीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला होता. सांबा जिल्हय़ात आंतरराष्ट्रीय सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराकडून सैनिकांनी आठ किलो हेरॉईनचा साठा जप्त केला होता. यादरम्यान सुरक्षा दलांनी घुसखोराला गोळय़ा घालून जखमी करत अटकेची कारवाई केली होती.