प्रतिनिधी /वास्को
दाबोळीहून मडगावच्या दिशेने जाणाऱया ईनोव्हा कारने सांकवाळ भागातील महामार्गावरील वीज खांबाला जोरदार धडक दिली. यात वीज उखडून पडला तर कार महामार्गावरच उलटी झाली. या अपघातात वाहन चालक सुदैवानेच बचावला.
हा अपघात सोमवारी दुपारी घडला. ईनोव्हा कार वेर्णा मार्गे मडगावच्या दिशेने जात होती. सततच्या पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्यावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने त्याने सरळ रस्ता दुभाजकावरील वीज खांबाला धडक दिली. या धडकेने वीज खांब उखडून पडला तर कारही रस्त्यावरच उलटली. वेर्णा पोलीस या अपघात प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.