मंगळूर – मंगळूर मध्ये धावत्या ऑटो रिक्षात ब्लास्ट झाल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाच्या तपासासाठी मंगळूर पोलीस आयुक्तांनी ३ पथके स्थापण केली आहेत. या ब्लास्ट प्रकरणाचा तपास करण्याकरिता राज्यभरात पोलिसांनी जाळे विणले आहे. हा ब्लास्ट आकस्मिक नव्हता तर गंभीर परिणाम होण्याचा या मागचा उद्देश होता. राज्य पोलीस व केंद्रीय एजन्सी याची चौकशी करीत आहे, असे पोलीस महासंचालकांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे . ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या हाथात एक प्लास्टिक बॅग होती आणि त्यामध्ये ब्लास्ट होणारी वस्तू होती असे समजले. तो व्यक्ती मंगळूर जंक्शन रेल्वे स्टेशन पासून १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नागुरी जवळ ऑटो मध्ये बसला होता . घटनेत त्याच्या शरीराच्या अर्ध्याहून अधिक भागाला जखम झाली आहे. जखमीवर उपचार सुरु आहे .
Previous Articleशस्त्रास्त्र कारखान्यात स्फोट; तीन महीलांसह ८जण जखमी
Next Article सुर्यकुमार यादवचं वादळी शतक, टीम इंडियाच्या १९१ धावा