नवी दिल्ली
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय संबंधांना अधिक दृढ करण्याविषयी चर्चा झाल्याचे मानले जात आहे. भारत आणि भूतान यांच्यातील संबंध ऐतिहासिक असून ते दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहेत. वांगचुक यांनी विदेश सचिव विनय मोहन क्वात्रा यांचीही भेट घेतली आहे. भूतानला चीनच्या घुसखोरीला सध्याला तोंड द्यावे लागत असल्याने तो भारताकडून अधिक मदतीची अपेक्षा करत आहे.