एकाचवेळी 40 हून रेल्वेगाडय़ा हाताळण्याची व्यवस्था
जगातील सर्वात मोठे रेल्वेस्थानक कुठे आहे हे माहिती आहे का? हे रेल्वेस्थानक सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश चीन आणि भारतात नसून अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आहे. जगातील सर्वात मोठय़ा रेल्वेस्थानकाचा मान ग्रॅड सेंट्रल टर्मिनलच्या नावावर आहे. हे स्थानक 1901 पासून 1903 दरम्यान निर्माण करण्यात आले होते. या स्थानकाच्या निर्मितीमागे एक रंजक किस्सा देखील आहे. त्या काळात पेन्सिल्वेनियाच्या रेलरोड स्टेशनशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीकोनातून याचे डिझाइन करण्यात आले होते.
या रेल्वेस्थानकाची निर्मिती अवजड यंत्रसामग्री नसलेल्या काळात झाली आहे. हे सर्वात मोठे रेल्वे स्थानक तयार करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे. हे रेल्वेस्थानक तयार करण्यासाठी दररोज 10 हजार कामगार एकत्र काम करत होते. हे स्थानक आकाराने मोठे असण्यासह स्थापत्यकला तसेच डिझाइनसाठी प्रख्यात आहे.
या स्थानकावर एकूण 44 प्लॅटफॉर्म्स असून तेथे एकाचवेळी 44 रेल्वेगाडय़ा थांबू शकतात. ग्रँड सेंट्रल टर्मिनलवर अनेक चित्रपटांचे चित्रिकरणही झाले आहे. भारतातील सर्वात मोठय़ा रेल्वे जंक्शनचा मान उत्तरप्रदेशातील मथुरा स्थानकाच्या नावावर आहे. तर उत्तरप्रदेशच्या गोरखपूर रेल्वेस्थानकावर जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे. यापूर्वी हा विक्रम खडगपूर स्थानकाच्या नावावर होता.