दत्ता शिरोडकर /पर्वरी
गोवा पर्यटन महामंडळाची एकेकाळी दिमाखाने मांडवीच्या तीरावर शान म्हणून मिरविणारी ‘ब्रिटोणा रेसिडेंसी’ आज शेवटच्या घटका मोजत आहे. त्याची फार दैयनिय अवस्था झाली आहे. ती वापरण्यास बंद केल्यापासून अभावानेच तिची कुणी डागडुजी केली असावी. आज तेथे गोवा पर्यटन महामंडळाच्या नादुरुस्त गाडय़ा पार्क करून ठेवल्या जात आहेत.सर्वत्र झाडे झुडपे वाढली आहेत. भटकी कुत्रे यांचे ते आश्रयस्थान झाले आहे. आज ही वास्तु एक दिवस कोणी तरी येवून आपली डागडुजी करेल आणि आपल्याला गत वैभव प्राप्त होईल. या भाबडय़ा आशेने वाट पाहत उभी आहे. नवीन पर्यटन मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी या रेसिडेंसीला नवीन झालर द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहे. कारण ही वास्तु त्यांच्याच मतदारसंघात येत आहे.
गोवा पर्यटन महामंडळाची ‘ब्रिटोणा रेसिडेंसी’ ही वास्तु मांडवीच्या किनाऱयावर वसलेली आहे. गोव्याची राजधानी पणजी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर ही वास्तु आहे. जे पर्यटक खास करून कॉलेज ग्रुप,फॅमिली, अशा लोकासाठी माफक दरात आरामदायी राहण्यासाठी ही उत्तम सोय होत होती. तसेच येथे शाकाहारी तसेच मांसाहारी अश्या जेवण्याच्या दोन खानावली होत्या. त्यामुळे पर्यटक आपल्या मर्जीनुसार जेवणाचा आनंद लुटत होते . या वास्तु मध्ये माफक दरात वीस, दहा,चार जणांच्या ग्रुपला एकत्र झोपण्यासाठी वेगवेगळय़ा खोल्या होत्या. तसेच खाली जमिनीवरही जोपण्यासाठी एक स्वतंत्र खोली होती. त्यात एकूण 74 माणसे एकाच वेळी झोपू शकत होती. शाळा ,कॉलेज किंवा अन्य क्लबच्या पर्यटक साठी ती उत्तम सोय होती.
या वास्तूच्या समोर भुरळ घालणारी अशी बाग होती. तसेच दिमाखाने डोलणारे एक वडाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.आजही ते झाड तेथे आहे.तसेच आजूबाजूच्या जुन्या झाडांमुळे हा परीसर पर्यंटकाना भुरळ घालत असे. त्यामुळे या वास्तूंत राहण्यासाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येत होते. या वास्तूच्या पाठीमागे बेती डोंगर असून पर्यटक फावल्या वेळात गिर्यारोहणाचा आनंद घेत होते. आज या डोंगराच्या माथ्यावर गोवा विधानसभा संकुलाची इमारत आहे. तसेच पर्यटक या वास्तूच्या बाहेर येवून मालीम – पणजी फेरीबोट पकडून पणजीत जात असे .या वास्तु पासून जवळच 1526 साली बांधलेली ‘पेन्ह दी फ्राक’ ही चर्च असून त्यालाही पर्यटक भेट देत असत.
पर्यंटकाना भुरळ घालणारी आणि आरामात मांडवीच्या किनाऱयावर बसून गळ टाकून मनसोक्त मासे पकडण्याचा आनंद लुटत जवळच्या ‘ब्रिटोणा रेसिडेंसी’ या वास्तुत सुखाने झोपी जाण्याचा अनुभव घेत आपापल्या गावी आठवणीचा खजाना घेऊन परत जात असत. पर्यंटकासाठी ही वास्तु खूप महत्वाची होती. गोवा पर्यटक महामंडळाने या वास्तुचे नूतनीकरण करून पुन्हा तिला तिचे गट वैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी ग्रामस्त करीत आहेत. या वास्तु मुळे स्थानिक लोकांनाही रोगाजर निर्माण होईल. पण आज ही वास्तु सरकार किंवा गोवा महामंडळाच्या अनास्थेमुळे शेवटच्या घटका मोजत आहे.असे एकंदरीत चित्र पाहताना दिसते.