100 जणांनी गाणे ऐकून केली आत्महत्या
प्रत्येक गाणे ऊर्जा देणारे असते असे नाही. यापूर्वी एक असे गाणी प्रचंड प्रचलित झाले होते, ज्यात ते ऐकून लोक आत्महत्या करत होते. याला सर्वात कुप्रसिद्ध गीत मानले जाते आणि हे गीत ऐकून 100 जणांनी आत्महत्या केली आहे. ग्लूमी संडे हे गाणे जगातील सर्वात कुप्रसिद्ध गाणे आहे. हे गाणे रेज्सो सेरेस अणि लॅजलो जावोर यांनी तयार केले होते आणि 1933 मध्ये हे गाणे लिहिले गेले होते. या गाण्याला हंगेरियन सुसाइड सॉन्ग या नावानेही ओळखले जाते. हंगेरीचे संगीतकार रेजसो सेरस यांनी हे गाणे ग्रेट डिप्रेशनला नजरेसमोर ठेवून लिहिले होते. त्यादरम्यान हंगेरीवर फॅसिस्टवादाचा प्रभाव पडू लागला होता. 1935 मध्ये पाल काल्मर यांनी हे गाणे रिकॉर्ड केले होते. या गाण्यात मानवतेचा अंत होत असल्याने दयेची भीक मागण्यात येत असल्याचे म्हटले गेले होते. मृत लोक रस्त्यांवर चालत असून गवताचे मैदान रक्ताने माखलेले असा या गाण्याचा आशय होता. 1935 मध्ये एका व्यावसायिकाने बुडापेस्टमध्ये आत्महत्या केली होती. त्याने स्वत:च्या सुसाइड नोटमध्ये ग्लूमी संडे गाण्यातील ओळींचा उल्लेख केला होता. रेज्सो सेरेस किंवा
लॅजलो जावोर यांच्यापैकी एकाच्या प्रेयसीने विष प्राशन करत आत्महत्या केली होती. तसेच सुसाइट नोटमध्ये केवळ ग्लूमी संडे असा उल्लेख केला होता. कथिततपणे 2 जणांनी गाणे ऐकल्यावर स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. तर एका महिलेने गाणे ऐकल्यावर पाण्यात उडी घेतली होती. तेव्हा या गाण्यावर हंगेरीत बंदी घालण्यात आली होती. तसेच 1968 मध्ये रेजसो सेरेस यांनी देखील आत्महत्या केली होती. हंगेरीत नेहमीच आत्महत्येचे प्रमाण अधिक राहिले आहे. हे गाणे प्रदर्शित झाले होते तेव्हा लोक पूर्वीच हताश अन् नैराश्यात होते. लोकांकडे खर्चासाठी पैसे नव्हते. अशा स्थितीत लोकांना आत्महत्याच सोपा मार्ग वाटत होता. यामुळे हे गीत ऐकून लोक अधिक दु:खी व्हायचे आणि हे गीत आपल्याशीच निगडित असल्याचे वाटायचे असे तज्ञांचे सांगणे आहे.