Turkey Earthqueck : तुर्कस्तान आणि सीरियातील (Siriya) विनाशकारी भूकंपामध्ये मृतांची संख्या जवळपास 5,000 वर पोहोचली आहे. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी तुर्कीसह इतर देशाचे बचाव पथके आणि स्थानिक नागरिक प्रयत्न करत असून प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
या प्रदेशात एकूण 5 मोठे भूकंपाचे हादरे बसले असून 7.8 रिष्टर स्केलचा धक्का सगळ्यात मोठा होता. या धक्क्यामुळेच या परिसरातीस सर्व इमारती, अपार्टमेंट्स आणि रुग्णालये उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे हजारो लोक जखमी किंवा बेघर झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी आलेला भूकंप हा ऑगस्ट 2021 मध्ये दक्षिण अटलांटिकच्या दुर्गम भागात झालेल्या भूकंपानंतर यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने नोंदवलेला सर्वात मोठा भूकंप होता. थंडीमुळे रात्रभर वाचलेल्यांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण होत असून रात्रभर तापमान गोठण्याच्या आसपास होते त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या किंवा बेघर झालेल्या लोकांची अवस्था खुपच वाईट झाली आहे.
तुर्कीमध्ये आतापर्यंत एकूण 11,000 इमारतींचे नुकसान झाले असून जवळपास वेगवेगळ्या एजन्सीसचे 25,000 आपत्कालीन बचाव करणारे प्रभावित असलेल्या परिसरांध्ये काम करत आहेत. शेजारच्या तुर्कीचा शेजारी देश सीरियामध्ये अनेक प्राणघातक भूकंप आणि भूकंपानंतर सीरियामध्ये किमान 1,602 लोक मृत्युमुखी पडले असून हजारो जखमी झाले आहेत.
शक्तीशाली 7.8 तीव्रतेचा भूकंपामुळे मृतांची संख्या 4,983 वर पोहोचली असून अजूनही इमारतींच्या ढिगाऱ्याखाली लोक आणि मृतदेह अडकल्याची दाट शक्यता आहे. अधिक बचाव कार्यातून हा आकडा अजून वाढण्याची श्क्यता आहे.
तुर्कीला बचाव आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी भारताने आज संध्याकाळी 60 पॅराफील्ड हॉस्पिटल आणि कर्मचार्यांसह आणखी दोन C-17 भारतीय हवाई दलाची विमाने तुर्कीला पाठवली आहेत. भारतीय संरक्षण अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा येथिल आर्मी फील्ड हॉस्पिटलमधील 89 सदस्यांचे वैद्यकीय पथक तुर्कीला रवाना झाले आहे.