ऑनलाईन टीम / तरुण भारत :
हिंगोलीतील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण करणं शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना चांगलंच भोवलं. बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाविद्यालयातील 5 जणांचाही सहभाग आहे.
तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय हे महिला प्राध्यापकांना त्रास देत असल्याचा आरोप करत बांगर यांनी उपाध्याय यांना महाविद्यालयात शिवीगाळ करत मारहाण केली होती. 18 जानेवारीला ही घटना घडली होती. प्रचार्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून अखेर 10 दिवसांनी पोलिसांनी बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा; मी तपासयंत्रणांचा बळी : धनंजय देसाई
केवळ बांगरच नाही तर त्यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे महाविद्यालयाच्या सीसीटिव्हीमध्ये दिसून आले. या संपूर्ण प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आमदार बांगर यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची सुद्धा तोडफोड केली होती. त्यामध्ये पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.