इचलकरंजी लगतच्या गावात प्रकार : पोलिसांनी नराधमाच्या आवळल्या मुसक्या
इचलकरंजी प्रतिनिधी
बहिणभावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना इचलकरंजी लगतच्या एका गावात घडली आहे. भावानेच गतिमंद चुलत बहिणीवर अनेकदा बलात्कार केला. या अत्याचाराने पिडीता गरोदर झाल्याने तीची तब्येत बिघडली. नातेवाईकांनी तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीतून ही बाब समोर आली. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
याबाबतची माहिती अशी, संशयीत भावाने आपल्याच गतिमंद चुलत बहिणीवर जानेवारी महिन्यात बलात्कार केला. यावेळी पिडीतेने भीतीपोटी हा प्रकार कुणासमोर उघड केला नाही. मात्र त्यानंतर संशयिताने पुन्हा 4 एप्रिल रोजी पिडीतेवर बलात्कार केला. पिडीतेला अचानक उलट्या सुरु होवून तब्येत बिघडली. त्यामुळे तिला नातेवाईकांनी शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ती 13 आठवड्याची गरोदर असल्याची गंभीर बाब समोर आली. याविषयी पिडीतेच्या नातेवाईकांनी शहापूर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी गांभीर्याने दखल घेवून नराधमाविरोधी गुन्हा दाखल केला. त्याला त्वरित अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या प्रकाराने पिडीतेच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.