ओटवणे / प्रतिनिधी-
सांगेली जायपीवाडी ते ग्रामपंचायत कार्यालयपर्यंतच्या भरवस्तीतील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. याबाबत संबंधित खात्याचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगेली गावातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी श्रमदानाने या रस्त्याची दुरुस्ती करून हा मुख्य रस्ता खड्डे मुक्त केला.
यावेळी शिवसेना विभागीय प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, सांगेली उपसरपंच रमाकांत राऊळ, ग्रामपंचायत सदस्य दीपक सांगेलकर, सांगेली शिवसेना शाखा प्रमुख आनंद सावंत, अशोक राऊळ, प्रकाश सनाम, प्रवीण गावडे, बबन सांगेलकर, दीपक कदम, सुरेश सांगेलकर,संतोष राऊळ, भिकाजी राऊळ आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.