2022 मध्ये खपण्याचा अंदाज ः टेक आर्कचा अहवाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये 70 लाखाहून अधिक आयफोन्सची भारतामध्ये विक्री होण्याचा अंदाज बाजारातील संशोधक फर्म टेक आर्क यांनी नुकताच वर्तविला आहे. यावषी आयफोन वापरकर्त्यांची संख्या दोन कोटीच्यावर पोहोचणार असल्याचेही फर्मने म्हटले आहे.
अलीकडे स्मार्टफोन बाजारामध्ये आयफोन या स्मार्टफोनला चांगलीच पसंती मिळत आहे. ठराविक वर्ग आजही आयफोन खरेदी करण्यामध्ये रस घेताना दिसतो. भारतीयांनी या फोनला जवळचे केले आहे. 2008 मध्ये भारतात लाँच झालेल्या आयफोनने नंतर मात्र विक्रीमध्ये वाढ सातत्याने दर्शविली आहे. 2008 मध्ये 50 हजार आयफोन्सची विक्री देशामध्ये झाली होती. 2022 वर्षात ही विक्री 70 लाखांवर पोहोचू शकते, असे फर्मने स्पष्ट केले आहे. सुरुवातीला आयटी क्षेत्रातील ग्राहकांनी आयफोन खरेदीवर जोर दिला होता. नंतर मात्र व्यावसायिकांनीही खरेदीवर भर दिल्याचे दिसले. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये 1 कोटी वापरकर्ते जोडले गेले आहेत.
2008 च्या तुलनेमध्ये आयफोनची विक्री यंदा 140पट अधिक असू शकते. याचवर्षी एकंदर 16कोटी 20 लाख इतक्या स्मार्टफोन्सची विक्री होण्याची शक्मयता आहे. स्मार्टफोन वापरकर्ते हळुहळू आयफोन खरेदी करताना दिसत आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
ऍपल उत्पादन घटविणार
ऍपल कंपनीने याच दरम्यान आपल्या आयफोन 14 चे उत्पादन घटविण्याचे ठरविले आहे. यावषी आयफोनच्या उत्पादनामध्ये 30 लाखांची घट केली जाणार असल्याचे ऍपलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या आधी कंपनीने 9 कोटी आयफोन्सची निर्मित करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. याऐवजी आता 8 कोटी 70 लाख आयफोन निर्मितीचे नवे उद्दिष्ट ठरविले गेले आहे.