एक बाटली घामाला 40 हजार रुपयांची किंमत
एका रियलिटी टीव्ही स्टारने पैसे कमाविण्यासाठी अजब कल्पना शोधून काढली आहे. ती स्वतःच्या घामाला एका बाटलीत जमा करते, मग हा घाम विकून लाखोंची कमाई करत आहे.
31 वर्षीय टीव्ही स्टार स्टेफनी मॅटोने हा उन्हाळा हॉट गर्लच्या नावावर राहणार आहे, मला घाम आल्यावर तो जमा करून विकत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या कनेक्टिकटमध्ये स्टेफनी राहत आहे. उन्हात स्वीमिंग पूलनजीक राहिल्यावरही 15 मिनिटांमध्ये घामाने एक जार भरून जातो. उन्ह अधिक असल्यास घामामुळे 10 बाटल्या भरतात. एका बाटलीला 40 हजार रुपयांमध्ये विकत आहे. दररोज सुमारे 4 लाख रुपयांपर्यंतची कमाई होत असल्याचा तिचा दावा आहे.
स्वीमिंग पूलनजीक बसणे मला आवडते, परंतु यात मेहनत लागत असल्याने याला क्षुल्लक समजू नका. माझ्या घामाद्वारे चाहते मला स्वतःच्या जवळ असल्याचे समजू शकतात असे स्टेफनीने म्हटले आहे.
घाम जमा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान मी स्वतःला अत्यंत हायड्रेटेड ठेवते, यामुळे अधिक प्रमाणात घाम फुटतो. दिवसभर उन्हात बसणे धोकादायक ठरू शकत असल्याने स्वतःच्या बचावासाठी खबरदारी घेत असल्याचे तिचे म्हणणे आहे.
स्टेफनीने यापूर्वी केलेला व्यवसाय तिच्या अंगलट आला होता. जुन्या व्यवसायामुळे तिच्या जीवालाच धोका निर्माण झाला होता. यामुळे तिने तो सोडून देणेच योग्य मानले होते. स्टेफनीने स्वतःच्या नव्या व्यवसायाबद्दल चाहत्यांना टिकटॉक आणि इन्स्टाग्रामद्वारे माहिती दिली आहे.