सेन्सेक्स 418 अंकांनी वधारले ः विदेशी गुंतवणुकीचा बाजाराला फायदा
वृत्तसंस्था/ मुंबई
विदेशी गुंतवणूकदारांच्या मजबूत लिलावामुळे देशातील शेअर बाजारात बुधवारी चौथे सत्र तेजीसह बंद झाले. सदरची सलग चौथ्या दिवशी तेजी प्राप्त करत सेन्सेक्स पुन्हा 60,000 अंकांवर पोहोचल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स बुधवारी 417.92 अंकांनी मजबूत होत 0.70 टक्क्यांसोबत निर्देशांक 60,260.13 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 119 अंकांनी वधारुन 17,944.25 वर बंद झाल्याचे दिसून आले. यामध्ये काही वेळ सेन्सेक्स 481 अंकांचा टप्पा प्राप्त करत उच्चांक गाठला होता. तर निफ्टीमधील 50 समभागामधील 33 समभाग लाभात राहिले होते.
सेन्सेक्समधील समभागांमध्ये बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, टेक महिंद्रा , एचसीएल टेक, एनटीपीसी, विप्रो आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे मुख्य समभाग नफा कमाईत राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये नुकसानीत राहिलेल्यांपैकी महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी , अल्ट्राटेक सिमेंट आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचा समावेश आहे.
बुधवारच्या सत्रात देशातील बाजारात तेजी प्राप्त होण्यास मुख्य कारण राहिले आहे, ते म्हणजे विदेशी संस्थांच्या गुंतवणूकारांकडून करण्यात आलेल्या लिलावाचा फायदा झाला आहे. यासोबतच पश्चिमेकडील बाजारांच्या चलनवाढीच्या प्रभावीत झाली असल्यानेही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचेही कारण महत्वाचे ठरत आहे. यामुळेच विदेशी गुंतवणूकदारांचा भारतासह अन्य बाजाराचा कल बदलत जात असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आह
विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला
कमोडिटी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमाईमुळे परदेशी गुंतवणूकदारांचाही आत्मविश्वास वाढला आहे. आशियातील अन्य बाजारामध्ये चीनचा शांघाय कम्पोजिट, जपानचा निक्की तसेच हाँगकाँगचा हँगसेंग नफा कमाईत राहिले आहेत. यासह दक्षिण कोरियाचा कॉस्पी नुकसानीसह बंद झाला आहे. दुसरीकडे युरोपातील प्रमुख बाजारात सुस्ती राहिली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह 92.22 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते.
यासह शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय भांडवली बजारात निव्वळ लिलावात मंगळवारी 1,376.84 कोटी रुपये किमतीच्या समभागांची खरेदी झाल्याची माहिती आहे.