ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा
बेळगाव : काँग्रेस रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या पदपथांना झुडपांचा आणि वेलींचा विळखा पडला आहे. त्यामुळे या पदपथावरून ये-जा करणे अवघड झाले आहे. तेव्हा ही झुडपे हटवावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. रस्त्याच्या बाजूला पदपथांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या पदपथांवर झाडे, झुडपे यांच्या फांद्या ये-जा करणाऱ्यांना अडथळा ठरत आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. त्याच्याच फांद्या या रस्त्यावर येत आहेत. बऱ्याचवेळा यामुळे अनेक जण जखमी होत असतात. तेव्हा तातडीने त्या फांद्या हटविणे गरजेचे आहे. काँग्रेस रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्याचबरोबर दोन्ही बाजूला पदपथांची निर्मिती करण्यात आली. त्या पदपथांच्या बाजूला शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. लहान असलेली ही झाडे मोठी झाली आहेत. त्यांच्या फांद्यांनी आता पदपथ पूर्णपणे झाकूण गेले आहे. त्यामुळे ये-जा करणे अवघड झाले आहे. तेव्हा महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष देऊन त्याची छाटणी करावी, अशी मागणी होत आहे.