मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती : मत्स्य खात्याज्या योजनांचा जनतेने लाभ घ्यावा : थिवी मतदारसंघात शैक्षणिक हब उभारणार
प्रतिनिधी / म्हापसा
राज्यात आता 108 रुग्णवाहिका धर्तावर पशुसंवर्धन खात्यातही आता 108 रुग्णवाहिका खास जनावरांसाठी 108 रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहे. जेणेकरून अनेक ठिकाणी रस्ता अपघातात जनावरे दगावतात. त्यांच्यासाठी ही सेवा फार उपयुक्त ठरेल.
राज्यात पशुसंवर्धन खात्यांतर्गत नवीन अन्य 3 इस्पितळे उभारण्याचा सरकारचा विचार असून त्यादृष्टीने सरकार या खात्यासाठी एक नवीन पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. राज्यात 15 आणखी डॉक्टर या खात्यात येणार असून ही इस्पितळे दिवसभर सुरू राहणार आहेत. रुग्णवाहिकेने येथे आणण्यात येणाऱया जखमी जनावरांवर त्वरित उपचार करण्यात येतील. हे जनावरांसाठी एक प्रकारचे वरदान ठरेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी व्यक्त केला. याचबरोबर या प्राण्यांना देण्यात येणारे खाद्य उत्कृष्ट दर्जाचे देण्यात येईल व यासाठी जास्तीत जास्त अनुदान देण्याकडे सरकारचा कल असेल, असेही मंत्री हळर्णकय यांनी स्पष्ट केले.
शेतकऱयांसाठी अनुदान योजने बदल करणार
अनुदान योजनेत बदल करून शेतकऱयांना कसे आकर्षित करता येईल, याकडे खाते विशेष लक्ष देणार आहे, अशी माहिती मंत्री हळर्णकर यांनी दिली. शेतीसाठी आज कामगार मिळत नाहीत, त्यादृष्टीनेही सरकार प्रयत्नशील आहे. ज्या पडीक जमिनी आहेत, त्याठिकाणी शेती लागवड कशी करता येईल, तसेच आज तिळारीचे पाणी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे, त्याचा वापर शेतीसाठी कसा करता येईल याकडे सरकार लक्ष ठेवून आहे. हॉटिकल्चरच्या आधारे भाजीचे राज्यात आता मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्या धर्तीवर युवा पिढीला कसे प्रोत्साहन देता येईल. त्या माध्यमातून आम्हाला सर्वेक्षण करावे लागेल. दूध बाहेरून येते, हा व्यवसाय राज्यात कसा पुढे नेता येईल, याकडे सरकार विचार करीत आहे, असे ते म्हणाले. डॉक्टर आहेत पण काही निवृत्त झाल्याने गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन डॉक्टर कामावर रुजू होणार आहेत. विविध अनुदान योजना आहेत, त्या तडीस लावण्यास ते उपयुक्त ठरणार आहे.
शापोरा, बेतुल येथे ड्रेजिंगचा प्रश्न सतावतोय
किनारी भागात ड्रेजिंगची समस्या मोठय़ा प्रमाणात आहे. हे काम पॅप्टन ऑफ पोर्टने काम हाती घ्यायला पाहिज,s कारण हे काम त्यांच्या अंतर्गत येते. आम्ही शापोरा व बेतूल या दोन ठिकाणी ज्या व्यावसायिक होडय़ा आहेत, त्यांना ये-जा करण्यासाठी आम्ही परवानगीसाठी मागणी केली असून त्यासाठी ते खाते तयारही झाले आहे. याबाबत त्या खात्याच्या अधिकारी वर्गाकडे बोलणीही झाली होती. अशी माहिती मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.
जुवारी नदी पणजी येथे ही समस्या नाही. वरील समस्या दोन ठिकाणी आहे. आज जे किनारी भागात आहेत नेरूल, बागा ते शापोरापर्यंत, रेवोडा, कामुर्ली आदी भागात आज मासेमारी करणारे लोक आज खूप कमी झाले आहेत. पण त्याबरोबर मच्छीमारी खात्यात बऱयापैकी विविध सुविधा उपलब्ध आहेत, त्या सुविध घेणारेच आम्हाला पाहिजे आहेत. जी आर्थिक कमाई पाहिजे ती त्यांच्याकडून होत नाही. त्यांना डिझेल आणि होडय़ांसाठी काय करता येईल, याचा सरकार अभ्यास करीत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अंत्योदय माध्यमातून त्यांना सुविधा मिळू शकते. फक्त यासाठी इच्छा दाखविणे गरजेचे आहे. बोटीच्या बदलीसाठी, कोल्डस्टोरेज, फुड प्रोसेसिंगसाठी आमच्या अनुदान योजना आहेत. मच्छी आयात-निर्यात करण्यासाठी आम्ही नेहमीच मदत करतो, असे मंत्री हळर्णकर म्हणाले.
मडकईत शिणाण्यो फार्मिंग, क्रेब फार्मिंग
ज्यांना अनुभव आहे, त्यांनी या मत्स्यव्यवसायात पुढे यावे जेणेकरून हा व्यवसाय जोमाने पुढे येणार आहे. काही दिवसांपूर्वी शिणाण्यो मत्स्य फार्मिंग सुरू केले आहे. पूर्वी कायसुवा शापोरा येथे हा व्यवसाय सुरू केला होता; मात्र कामुर्ली, तिळारी धरणाचे पाणी सोडल्यामुळे त्या मृत झाल्या. आता मडकई फार्मिंगमध्ये या शिणाण्यो तीन महिन्यांच्या झाल्या आहेत. त्यांचे प्राण्यांसाठी उत्पादन चांगले आल्याची माहिती मंत्री हळर्णकर यांनी दिली. क्रेब फार्मिंग व्यवसाय स्वतःच्या घरात करू शकतात. यासाठी लोकांनी पुढे येण्यासाठी मच्छीमारांनीच नव्हे तर अन्य कुणीही हा व्यवसाय करू शकतो, यासाठी सरकारचे अनुदानही उपलब्ध आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यासाठी व्यावसायात वाढ करता येते.
थिवी मतदारसंघात शैक्षणिक हबसाठी प्रयत्न
थिवी मतदारसंघात करासवाडा औद्योगिक वसाहत तसेच बिनानी कंपनी आहे. नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी येथे जमीन उपलब्ध नाही. ग्लेनमार्क व बिनानी या दोनच मोठय़ा कंपन्या आहेत अन्य छोटय़ा आहे. थिवी मतदारसंघात शैक्षणिक हबसाठी आपण प्रयत्नशील आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा लोकांना मिळण्यासाठी या ठिकाणी तशा शैक्षणिक सुविध उपलब्ध करणे गरजेचे असून त्यादृष्टीने आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत. शापोरा नदीत ते हळर्ण वझरी दरम्यान, आयलॅण्ड पर्यटन क्षेत्र करण्याचा आपला विचार आहे. पर्यटनदृष्टय़ा बोटीची सफर या नदीच्या पात्रात सुरू करण्याचा आपला विचार आहे. यात प्पर्यटक या भागात आकर्षित करण्याच्या यादृष्टीने आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.
चोरी, दरोडे, गोळीबार होणे हे प्रकार गंभीर
राज्यात चोरीचे प्रमाण, दरोडे, खुलेआम गोळीबार होणे ही गंभीर बाब आहे. चोरीत बिगरगोमंतकीय चोरटे गुंतलेले आहेत. गेल्या वर्षभराचा आढावा घेतल्यास पोलिसांनी बऱयाच चोरटय़ांना गजाआड केले आहे. जेवढे पोलीस हुशार आहे, तेवढे चोरटेही हुशारी आहेत. मात्र राज्यातील पोलीस यंत्रणा चांगल्यापैकी तपासकाम करतात. ते त्आरोपींना ते शोधून काढणारच, असा विश्वास मंत्री हळर्णकर यांनी व्यक्त केला.
बेकायदा डान्सबार, मसाज पार्लरवर कारवाईची गरज
पर्यटन क्षेत्र बंद झाल्यास त्याचा परिणाम राज्याला भोगावा लागेल. कारण पर्यटन म्हणजे राज्याचा आज आर्थिक कणा आहे. मसाज पार्लर, डान्सबार यामध्ये जी गैरकृत्ये चालतात, त्यावर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे, मात्र आम्ही पर्यटन व्यवसायही तितकाच सांभाळून ठेवणे, आज काळाची गरज आहे. बेकायदेशीर मसाज पार्लर, डान्सबारवर बंदी आणली पाहिजे. चंदगडच्या पर्यटकांशी जे काही घडले ही वाईट घटना आहे. असे प्रकार गोवा राज्यासाठी धोकादायक आणि बदनाम करणारे आहे. सरकार यावर कडक कारवाई करणार यात शंकाच नाही. धर्मांतराबाबत बोलायचे झाल्यास गरिबांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन धर्मांतर करणे चुकीचे आहे. धर्मांतर विरोधी कायदा होणे गरजेचे आहे.
राज्यात महागाई असली तरी राज्य प्रगतीच्या दिशेने
केंद्र सरकारच्या आज 150 हून अधिक विविध योजना आहेत. त्यामुळे राज्य सरकार कुठेच कमी पडणार नाही. त्यांचा योग्य मार्गाने लाभ घेऊन विकास केला पाहिजे. यासाठी प्रत्येकाने कष्ट घेण्याची गरज आहे. केवळ नागरिकांनी सरकारच्या योजनांवर अवलंबून राहता स्वतः झटले पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारचा महागाईच्या काळातही कारभार योग्यरित्या चालत आहे. यावर मात करून लवकरच विकासात्मक प्रगती साधणार आहोत, अशी माहिती मंत्री हळर्णकर यांनी यावेळी दिली.