मुंबई
सरकारने पोलादाच्या निर्यातीवर शुल्क रद्द केल्याच्या घोषणेचा परिणाम शेअर बाजारातील स्टील (पोलाद) कंपन्यांवर सोमवारी सकारात्मक दिसला. यामध्ये सेल कंपनीचा समभाग तर 19 टक्के इतका वाढताना दिसला. सरकारने पोलाद उत्पादने व कच्च्या साहित्यावरील निर्यात शुल्क मागे घेण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. जिंदाल स्टेनलेस, एनएमडीसी, प्रकाश इंडस्ट्रिज व गोदावरी पॉवर अँड इस्पात यासारख्या कंपन्यांच्या समभागात जवळपास 3 टक्के इतकी तेजी बाजारात सोमवारी पाहायला मिळाली.