दसरोत्सवाचे औचित्य
वार्ताहर/कुडाळ
तेंडोली-गोलमवाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी दसरोत्सवाचे औचित्य साधून तेंडोली-भोमपूल ते तेंडोली-भोमवाडी रस्त्याची साफसफाई केली.दरवर्षी दसऱ्या दिवशी तेथील ग्रामस्थ रस्त्याची पूर्ण साफसफाई करतात. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे वाढली होती. त्यामुळे वाहन धारकांना त्रास होत होता. तेथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडे कटर मशीनच्या सहाय्याने कापून रस्ता पूर्ण मोकळा केला. संबंधित प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केला होता. रस्ता मोकळा केल्याबद्दल वाहनधारकांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
यावेळी महेश गावडे, निलेश गावडे, नितेश गावडे, संजय गावडे, राजन परुळेकर, नरसिंह प्रभू, शंकर गावडे, प्रवीण खानोलकर, कौशल राऊळ, सदा खानोलकर, राजू गावडे आदी ग्रामस्थांनी श्रमदान केले.