सरकारी वकील पुष्पराज शेटय़े यांचा युक्तीवाद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जाकादेवी सेंट्रल बँक दरोडा खटल्यात सरकारी पक्षाकडून पुन्हा एकदा युक्तीवाद करण्यात येत आह़े शुक्रवारी सरकारी पक्षाचे वकील पुष्पराज शेटय़े यांनी सांगितले की, दरोडय़ाच्यावेळी जखमी सुरेंद्र गुरव याने प्रत्यक्ष घटनाक्रम न्यायालयापुढे कथन केला आह़े त्याचप्रमाणे आपल्याला गोळी कशाप्रकारे मारण्यात आली, हे देखील सांगितल़े प्रत्यक्ष जखमी झालेल्या गुरव याची साक्ष या खटल्यात महत्वपूर्ण असून यामधून आरोपीनीच गुन्हा केल्याचे सिद्ध होत असल्याचे सरकारी वकील शेटय़े यांनी न्यायालयापुढे सांगितल़े
रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक राजाराम जोशी यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आह़े या खटल्यात एकूण 35 साक्षीदारांनी आपला जबाब न्यायालयापुढे नोंदवला आह़े यातील 2 साक्षीदार हे सरकारी पक्षाला फितूर (फुटले) झाले आहेत़ यापूर्वी या खटल्यात सरकारी पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला होत़ा तत्कालीन सत्र न्यायाधीश एमक्यूएसम शेख यांची अन्य ठिकाणी बदली झाली. यामुळे या खटल्याचा पुन्हा नव्याने युक्तीवाद करण्यात येत आह़े मागील 9 वर्षापासून चालणाऱया या खटल्याचा निकाल लवकरच लागण्याची अपेक्षा व्यक्त केला जात असतानाच शेख यांच्या बदलीमुळे निकालासाठी आणखी काही काळ विलंब होणार असल्याचे बोलले जात आह़े
जाकादेवी सेंट्रल बँक येथे 28 नोव्हेंबर 2013 रोजी दरोडा टाकण्यात आला होत़ा यावेळी संशयित आरोपींनी बँकेतील कर्मचारी संतोष चव्हाण (ऱा धामणसे) गोळी घालून ठार केले होत़े तर अन्य सुरेंद्र गुरव हा गंभीर जखमी झाला होत़ा तसेच संशयित आरोपी हे बँकेच्या तिजोरीतील सुमारे 6 लाख 88 हजार रुपयांची रक्कम घेऊन आरोपी खासगी वाहनाने फरारी झाले, असा आरोप संशयित 6 जणांवर ठेवण्यात आला होत़ा या आरोपींमध्ये राजेंद्र राजावत (25, रा. कल्याण), हरिष गोस्वामी (25, रा. कल्याण), प्रथमेश सावंत (18, रा. जाकादेवी), शिवाजी भिसे (25, रा. कल्याण), निखिल सावंत (24, रा. डोंबिवली) आणि प्रशांत शेलार (28, रा. मुंबई) यांचा समावेश आहे
ऍड. शेटय़े यांनी न्यायालयापुढे सांगितले की, दरोडय़ाच्या घटनेत गोळी लागून गंभीर जखमी सुरेंद्र गुरव याच्यावर कोल्हापूर येथील रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल़ी त्याच्या शरीरात घुसलेली गोळी डॉक्टरांनी बाहेर काढल़ी ही गोळी बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आल़ा शरीरातून बाहेर काढण्यात आलेल्या गोळीमुळे गुरव याला झालेली जखम ही गोळी मारल्याने झाली होती, हे सिद्ध होत़े त्या संबंधीची ऑपरेशन करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांच्या साक्षीचा उल्लेख ऍड़ पुष्पराज शेटय़े यांनी न्यायालयापुढे केल़ा
यापूर्वी झालेल्या युक्तीवादावेळी शेटय़े यांनी सांगितले की, जाकादेवी बँक दरोडा प्रकरणात मृत संतोष चव्हाण याचे कपडे जप्त करण्यात आले होत़े त्याच्या शर्ट व बनियनवर होल असल्याचे स्पष्टपणे दिसत आह़े मृत संतोष चव्हाण यांच्या शरीरावरील बंदुकीच्या गोळीची जखम आह़े तसेच त्याच्या शर्ट बनियनलाही होल पडलेला आह़े त्यामुळे बंदूकीची गोळी त्याच्या शर्ट व बनियनमधून शरीरात गेल्याचे स्पष्ट होत आह़े खटल्यातील कपडे जप्तीचा पंचनामा अत्यंत महत्वाचा पुरावा ठरत आह़े
खटल्यातील मुख्य आरोपी राजेंद्र राजावत, शिवाजी भिसे व प्रशात शेलार यांनी पोलिसांना निवेदन दिले होत़े त्यांच्या निवेदनानुसार दरोडय़ातील पैसे, बंदूक व इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होत़ा तसेच आरोपी प्रशांतने पळून जाण्यासाठी वापरलेल्या गाडीची बनावट नंबरप्लेट फुणगूस येथे फेकून दिली होत़ी ही नंबरप्लेट त्याने दिलेल्या निवेदनानुसार पोलिसांकडून जप्त करण्यात आल़ी यामुळे आरोपींनी दिलेल्या या निवेदनामुळे सरकारी पक्षाची बाजू बळकट होत असल्याचे ऍड़ शेटय़े यांनी सांगितल़े
बँक दरोडय़ावेळी प्रतिभा शिंदे या बँकेत पॅशियर म्हणून काम करत होत्य़ा त्यांनी आपल्या साक्षीत 5 आरोपींना बँकेत प्रवेश करताना पाहिले होत़े तसेच आरोपीने बँक मॅनेजर कविश्वर यांच्या डोक्याला बंदूक लावून पैसे लुटले, असे त्यांनी पाहिल्याचे न्यायालयापुढे सांगितल़े यावरून बँक मॅनेजर कविश्वर व पॅशियर शिंदे यांचा जबाब एकमेकांशी जुळत आह़े तसेच पॅशियर शिंदे यांनी आरोपींना न्यायालयापुढे ओळखले आह़े ही बाबही या खटल्यात अत्यंत महत्वाची असल्याचे ऍड. शेटय़े यांनी न्यायालयापुढे सांगितले होत़े