29 सप्टेंबरला झळकणार चित्रपट
एंटरटेन्मेंट वनने स्वत:चा अॅक्शन थ्रिलर ‘द क्रिएटर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट 29 सप्टेंबर रोजी झळकणार आहे. चित्रपटात जॉन डेव्हिड वॉशिंग्टन, गेमा चॅन, केन वतनबे, स्टर्गिल सिम्पसन, मेडेलीन युना वॉयल्स आणि अकॅडमी पुरस्कार विजेती एलिसन जेनी दिसून येणार आहे.
मानवप्राणी अन् आर्टिफिशियल इंटेलिजेन्सदरम्यान भविष्यातील युद्धाची ही कहाणी असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले. मानवी समुदायाला संपविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या रहस्यमय अस्त्रावर हा चित्रपट आधारित असून यात जबरदस्त अॅक्शनदृश्यं दिसून येणार आहेत.
चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटातील कलाकार पाहता प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वातावरणनिर्मिती झाली आहे. जॉन डेव्हिड वॉशिंग्टन, एलिसन जेनी यांचा दमदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार असल्याचे मानले जात आहे.