बेळगाव : बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर गणेश मंदीरकडे जाणार्या रस्त्यावर अशास्त्रीय पद्धतीने स्पीड ब्रेकर घालण्यात आले असून हा स्पीड वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. तसेच या स्पीड ब्रेकर उंची जास्त असल्याने चारचाकी वाहनांनाच्या इंजिनला घासत असल्यामुळे वाहनांनाही धोका निर्माण झाला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी या रस्तावर अपघात झाला होता. याची दखल घेऊन एपीएमसी प्रशासनाने घाईगडबडीत अशास्त्रीय पद्धतीने हे स्पीडब्रेकर बसवले. मात्र, या स्पीड ब्रेकरची अवस्था पाहता रोग बरा पण ईलाज नको अशी प्रतिक्रीया व्यापारी, कर्मचारी आणि वाहनधारकांमधून होत आहे.
तसेच बाजार समितीने याची दखल घेऊन शास्त्रीय पद्धतीने स्पीडब्रेकर घालण्याची मागणी जोर धरत आहे.