बेंगळूर
विप्रो इन्फास्ट्रक्चर इंजिनिअरिंगचा औद्योगिक ऑटोमेशन व्यवसाय असलेल्या विप्रो पेरीने नुकतेच जर्मन कंपनी हॉशरेनरच्या अधिग्रहणासाठीच्या करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली आहे.
अधिग्रहणासाठी निर्णायक करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे विप्रोने एका निवेदनात म्हटले असून त्यांनी या कराराचा आर्थिक तपशील मात्र उघड केलेला नाही. विप्रो पेरीसाठी ही बाब समाधानकारक असून समूहाच्या युरोपमधील धोरणात्मक विकासाच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. आगामी काळात विकासासाठी अधिक संधी प्राप्त होणार आहे. 1973 पासून कार्यरत असलेल्या हॉशरेनर ऑटोमेशन तंत्रज्ञानातील एक महत्वाचा पुरवठादार म्हणून कार्यरत आहे.