ऑलिपिंक वीर अशोक कुमार यांचे गौरवोदगार
प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालिम संघाने आजपर्यंत अनेक मल्ल घडवले. ते मल्ल मोठमोठय़ा पदावर आज कार्यरत आहेत. सातारा तालिम संघाच्या पुढाकारामुळे साताऱयात महाराष्ट्र केसरीचा आखाडा यशस्वीपणे पार पडल्याचे आम्ही पाहिले. याच तालिमीकडून अनेक मल्ल घडोत. आमचा सन्मान या तालिमीकडून होतोय याचे भाग्य आम्हाला मिळाले, असे मत अर्जुनवीर ऑलिंपिक विजेते अर्जुन कुमार यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांनी सातारा तालिम संघाचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.
सातारा तालिम संघास हिंद केसरी संजय कुमार आणि ऑलिंपिक वीर अर्जुन कुमार यांनी भेट दिली. त्यांचा छोटेखानी स्वागत सोहळा सातारा तालिम संघाच्यावतीने घेण्यात आला. तालिम संघाचे मार्गदर्शक साहेबराव पवार यांनी सातारी पद्धतीने त्यांचा सन्मान केला. यावेळी सातारा तालिम संघाचे दीपक पवार, सुधीर पवार, महाराष्ट्र केसरी माणिक पवार, जीवन कापले, आबा शिंगरे, वैभव फडतरे, राजेश्वर पवार, देवराज पवार, संदीप मांडवे यांच्यासह तालिम संघातील मल्ल उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय कुमार म्हणाले, कुस्ती हा एक असा खेळ आहे. तिथे मन, मनगट आणि मेंदू हे तिन्ही असावे लागते. सयंम असावा लागतो. सातारा तालिम संघाबाबत मी ऐकून होतो. मार्गदर्शक साहेबराव दादांनी खूप कष्ट सोसले आहेत. मल्लांना घडवणे सोपी बाब नाही. तालिमीमध्ये मेहनत घेणाऱयां मल्लांना आधार लागतो तो आधार म्हणजे साहेबराव दादांचा आहे, असे त्यांनी सांगितले. साहेबराव पवार यांनी सातारा तालिमीच्या कामासंदर्भातही माहिती त्यांना दिली.