अर्थ मंत्रालयाने जारी केली अधिसूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
12-15 टक्के इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलवर आता उत्पादन शुल्क भरावे लागणार नाहीत. अर्थ मंत्रालयाने इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलला चालना देण्यासाठी ही घोषणा केली आहे. याचबरोबर अर्थ मंत्रालयाने यासंबंधी अधिसूचना देखील जारी केली आहे.
पेट्रोलमध्ये 12-15 टक्क्यांपर्यंत इथेनॉल ब्लेडिंग करण्यात आल्यास ब्लेंडेड इथेनॉलवर उत्पादन शुल्कापासून सूट मिळणार असल्याचे सांगण्यात आले. एक महिन्यापूर्वी तेल विपणन कंपन्यांनी इथेनॉल ब्लेडिंगचे सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत 9.5 टक्क्यांचे लक्ष्य गाठले होते. तेल विपणन कंपन्यांनी आता इथेनॉल ब्लेंडिंगमध्ये 10 टक्क्यांचे लक्ष्य प्राप्त केले आहे. सरकारकडून आता पुढील लक्ष्य ठरविण्यात आले आहे.