कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी कॉंगेरस पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून यामध्ये आपल्या राष्ट्रिय नेत्यांबरोबर काही मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. अपेक्षेप्रमाणे कॉग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाचे राज्य युनिट प्रमुख डीके शिवकुमार, आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह भाजपला सोडचिट्ठी देऊन कॉंग्रेसमध्ये सामिल झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लिंगायत नेते जगदीश शेट्टर यांचाही समावेश स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये केला गेला आहे.
पुढील महीन्याच्या 10 तारखेला होणाऱ्या कर्नाटक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी आपल्या प्रचाराची धार वाढवली आहे. यासाठी आपापल्या पक्षातील प्रभावी नेत्यांची फळी उभा करून प्रचारयंत्रणा उभी करण्यावर भर दिला आहे. कॉग्रेस पक्षानेही आपल्या प्रचारासाठी प्रभावी नेत्यांची यादी जाहीर केली आहेत.
या यादीमध्ये अपेक्षेप्रमाणे राहूल गांधी आणि सोनिया गांधी हे स्टार प्रचारक आहेत. तर कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कर्नाटकचे सुपुत्र मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर विषेश जबाबदारी आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल, राज्यसभेचे खासदार शशी थरूर, प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला, माजी केंद्रिय मंत्री जयराम रमेश, पी चिदंबरम यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहे.
त्याच बरोबर तीन मुख्यमंत्र्य़ांच्या नावाचा यादीत समावेश केला गेला असून त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्कू यांच्यासह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या नेत्यांचा समोवेश यामध्ये केला गेला आहे. भारतीय जनता पक्षाने तिकिट नारारलेल्या आणि हुबळी या मतदारसंघातून अनेकदा निवडून आलेल्या जगदिश शेट्टर यांना कॉंग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये स्थान दिले आहे.
युवकांना आकर्षित करण्यासाठी कॉग्रेसने कन्हैय्याकुमार या कॉग्रेस नेत्याचा समावेश केला असून राजस्थानमधील प्रभावी नेते सचिन पायलट यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. 224 जागेसाठी काँग्रेसने आतापर्यंत 216 उमेदवारांची घोषणा केली असून वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वीच कर्नाटक काँग्रेसने 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.