गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कशी असेल :
- शासनाद्वारे देण्यात आलेल्या ८१४७५००५०० या मोबाईल क्रमांकावर आपला रेशनकार्ड नंबर एसएमएस केल्यास ३-४ सेकेंदात निर्धारित स्थळ, दिनांक व वेळेबद्दल माहिती घरबसल्या मिळेल. यामुळे अर्जदारांना रांगेत थांबाण्याची गरज नाही.
- एसएमएसमध्ये सांगण्यात आलेल्या दिवशी कर्नाटक – वन, बापूजी केंद्र, बेंगळुरू – वन, ग्राम- वन केंद्रांमध्ये अर्ज दाखल करता येतो.
- याशिवाय शासनाकडून विशेष प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना एक खास ऍप देण्यात आलेले आहे. या ऍपद्वारे ते घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे काम करून मार्गदर्शन करतील.
- अर्ज करण्यासाठी रेशनकार्ड, कुटुंब प्रमुख महिलेचे आणि तिच्या पतीचे आधारकार्ड, आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक.
- आधारकार्ड लिंक नसलेल्या बँक खात्यात पैसे जमा करायचे असल्यास बँक अकॉउंट तपशील देणे गरजेचे आहे. बँक पासबुक आणि आधारकार्डवरील असलेला मोबाईल क्रमांक एकच असल्यास त्वरित गृहलक्ष्मी योजनेची मंजूर कॉपी अर्जधारकांना मिळणार आहे.
- अधिक माहितीसाठी संबंधित विभागाच्या १९०२ क्रमांकाशी संपर्क साधू शकता.