कुपवाड पोलिसांची कारवाई
कुपवाड प्रतिनधी
कर्नाटकातील विजापूर येथे सोशल माीडयावर गाजत असलेले एक प्रेमीयुगूल राविवारी सायंकाळी कुपवाड पालिसांना बामनोली हद्दीत सापडले. ‘त्या’ प्रेमीयुगुलास ताब्यात घेवून पालिसांनी चौकशीअंती त्यांना विजापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाची बामनोलीसह कुपवाड परिसरात जोरदार चर्चा रंगली होती.
कर्नाटकच्या विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकाच महविद्यालयात शिक्षणाऱ्या या प्रेमीयुगूलात मुलगी अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तिच्यासोबतच्या तरूणाला व अल्पवयीन मुलीला कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन, कागवाड येथे विजापूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कारवाई कर्नाटक पोलिस करतील, असे कुपवाड पोलीसांनी सांगितले. या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत माहीती अशी, बामनोली येथे सापडलेले प्रेमीयुगूल कर्नाटकातील विजापूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत एका महाविद्यालयात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. यातील मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच महाविद्यालयात शिक्षणाऱ्या तरूणाने त्या मुलीला सोबत घेवून काही दिवसांपूर्वी विजापूर येथून सांगलीत आणले. ते दोघे रविवारी सायंकाळी बामनोली (ता.मिरज) येथील एका दवाखाना परिसरात फिरत असल्याचे कर्नाटकातून आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आले. कर्नाटकात बऱ्याच जणांच्या सोशल मीडियावर लव्ह जिहाद प्रकरणातील हे युगूल असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहीती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी कुपवाड पोलिसांना माहीती दिली. पोलिसांनी त्या प्रेमीयुगुलास ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते कर्नाटकातून पळून आल्याची कबुली दिली. कुपवाड पोलिसांनी याप्रकरणी विजापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता ते दोघे कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झाले. खात्री पटल्यानंतर कुपवाड पोलिसांनी प्रेमीयुगुलास सोबत घेऊन त्यांना कागवाड येथे विजापूर ग्रामीण पा†लसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे लव्हजिहाद प्रकरणातील प्रेमीयुगुलाची कर्नाटकातून सुटलेली सुसाट गाड़ी बामनोलीत अडकली अन् पुन्हा कर्नाटकात पोहोचली अशीच चर्चा दिवसभर या परिसरात होती.