कोल्हापूर : नवरात्रीमुळे मागच्या दोन दिवसांपासून अंबाबाई मंदिरात मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, लाखो भाविक येत असल्याने गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंदीर परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. अंबाबाई मंदिरात महिला भाविकाचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मुख दर्शनाच्या रांगेत असलेल्या एका महिलेचे 70 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र सोनबत्ती जाटब या महिलेने चलाखीने लंपास केले होते. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. जुना राजवाडा पोलिसांत याची नोंद होताच तात्काळ पोलिसांनी चोरट्या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या दोन दिवसांपासून अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, या गर्दीचा फायदा घेत चोरी करण्यासाठी काही महिला सक्रीय झाल्याची माहिती समोर आली आहे. भाविकांच्या दर्शन रांगेसाठी मोठी गर्दी असल्याने महिला दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला टाकण्यात आला. दरम्यान ही बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने चोरी केलेल्या महिलेचा चेहरा लक्षात आला. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे
Previous ArticleKolhapur : इन्स्पायर अवॉर्डमध्ये कोल्हापुरची बाजी
Next Article स्वस्थ बालक-बालिका स्पर्धेत अन्वी गावकर प्रथम
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.