ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या काही आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईवर शिक्कामोर्तब होणार असून, त्यापूर्वीच एकनाथ शिंदे राजीनामा देतील. मग महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मुख्यमंत्री होतील, अशा वावडय़ा काही मंडळी सोशल मीडियावर उठवत आहेत. त्यावर विखे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
विखे पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे राजीनामा देतील, मग मी मुख्यमंत्री होईल, असे वावडे काही लोक सोशल मीडियावर उठवत आहेत. हे वृत्त कपोलकल्पीत असून, मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. यात कोणतेही तथ्य नाही. राज्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सक्षम नेतृत्त्व मिळाले आहे. राज्याचा निर्णय हा प्रधानमंत्र्यांच्या स्तरावर झाला असल्याने यामध्ये कुठलीही विसंगती असण्याचे कारण नाही.
अधिक वाचा : मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; पुण्यातून कॉलर अटकेत