जेष्ठ निरुपणकार आणि समाजसेवक अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भुषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार जाहीर झाला आहे. यासंबंधीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्विटरवरून केली.
महाराष्ट्र भुषण पुरस्काराच्या मानकऱ्याची निवड ही निवड समितीच्या शिफारसीवरून करण्यात येते. निवडसमितीने अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाला पसंती दिल्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव जाहीर केले. त्यानंतर त्यांनी अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची रेवदंडा येथे भेटही घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखिल (Devendra Fadanvis) उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराचे मानकरी असलेले दत्तात्रेय उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी हे गेली 30 वर्षे निरुपण आणि लोकजागृती क्षेत्रात काम करत आहेत. त्याच बरोबर त्यांनी अधिवासी आणि वाड्यावस्त्यांवर व्यसनमुक्तीचेही उल्लेखनीय काम केले आहे.