प्रतिनिधी /पणजी
अग्निशामक दलात काम करणारे तीन कर्मचारी आज अग्निशामक सेवेतून निवृत्त झाले आहे. अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अग्निशामक दलात सहाय्यक अधिकारी म्हणून काम करणारे विवेकानंद भाटीकर यांनी 38 वर्षे अग्निशआमक दलात सेवा बजावली आहे. ऊई फार्नांडिस यांनी सहाय्यक 38वर्षे तर लिडींग फायर फायटर पदावर असलेले आनंद नाईक तुयेकर यांनी 32 वर्षे अग्निशामक दलात सेवा बजावली आहे.