प्रतिनिधी/कारवार:खेळत असताना तीन वर्षाची चिमकुली विहिरीत पडून मृत्यू पावल्याची घटना कारवार जिल्ह्यातील हरीदेव येथे घडली आहे.स्तुती सूरज बंट असे दुर्दैवी चिमकुलीची नाव असून ती सकाळी हातात गणपती मूर्ती तयार करण्याची माती घेवून खेळत होती. त्यानंतर साडे अकरा वाजल्यापासून ती बेपत्ता झाली होती. दुपारी दीडच्या सुमारास तिचा मृत देह विहरीत तरंगताना आढळून आला.
माती विहरित टाकताना तोल जाऊन पडली असावी अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. आज अंगणवाडीला सुटी नसती तर ही दुर्घटना टळली असती असे सांगण्यात आले. स्तुतीच्या निधनाबद्दल हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे.