वास्को : वेर्णा औद्योगिक वसाहतीतील मार्गावर धावत्या दुचाक्यांवरून धोदायक कसरती करण्याचे प्रकार वाढले आहेत. वेर्णा पोलिसांनी गुरूवारी संध्याकाळी अशा कसरती प्रकरणी तिघा युवकांना अटक केली. त्यांच्या दुचाक्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच फोंड्यातील एका युवकाला अशाच कसरती प्रकरणी अटक करून त्याची दुचाकी जप्त केली होती. अधिक माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी तिघे युवक वेर्णा औद्योगिक वसाहतीतील आयएफबी कंपनीजवळील मार्गावरून मोटरसायकलवरून धोकादायक स्टंट करत होते. या कसरती करताना वाहतुकीचे सर्व नियम झुगारून स्वताच्या आणि इतरांच्या जीवाला ते धोका निर्माण करीत होते. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन तिघा युवकांसह त्यांच्या दुचाक्या जप्त केल्या. नंतर त्यांना अटकही करण्यात आली. सुफियान डिंगार (22, केपे), साहील बांदोडकर (25, कुडचडे), लिएंडर कुतिन्हो (20 माजोर्डा) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. त्यांच्याकडून केटीएम ड्युक, निंजा व केटीएम आरसी या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
Previous Article‘सागरमाला परिक्रमा’च्या दुसऱ्या टप्प्याचा काणकोणात समारोप
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.