धावत्या प्रवासी रेल्वेच्या इंजिनला आग ः सुदैवाने जीवितहानी टळली
पटना / वृत्तसंस्था
बिहारमधील मोतिहारी येथे रविवारी एका धावत्या प्रवासी रेल्वेच्या इंजिनला आग लागली. चालकांना आगीची माहिती समजताच प्रसंगावधान राखत रेल्वेचे इंजिन इतर डब्यांपासून वेगळे केल्याने सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, आगीच्या भीतीमुळे यावेळी टेनमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी रेल्वेतून उडय़ा मारल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेनंतर दुसरे इंजिन बसवून टेन नरकटियागंजपर्यंत नेण्यात आली. आगीचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास केला जात असून आग कशी लागली याचा शोध घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
रविवारी सकाळी 6.10 वाजता रक्सौलहून नरकटियागंजला जाणाऱया टेनला हा अपघात झाला. रेल्वे कर्मचाऱयांना याची माहिती मिळताच रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली. यादरम्यान प्रवाशांनीही टेनमधून उडय़ा मारल्या आणि धावपळ सुरू केली. मात्र, एकाही प्रवासी व चालकाला काहीही झाले नाही. टेनजवळ उपस्थित असलेल्या कर्मचाऱयांनीही बोगीत पोहोचून लोकांना खाली उतरवले. यानंतर इंजिनला जोडलेल्या बोगी वेगळय़ा करण्यात आल्या.
रक्सौल जंक्शन येथून निघाली प्रवासी रेल्वे
05541 पॅसेंजर टेन रक्सौल जंक्शन येथून दररोज पहाटे 5ः30 वाजता सुटते. दरम्यान, रविवारी टेन रक्सौलमधील भेलाहीच्या पुल क्रमांक 39 जवळ आली असता अचानक आग लागली. तेथे उपस्थित रेल्वे कर्मचाऱयांनी धूर पाहिल्यानंतर रेल्वेच्या इंजिनला आग लागल्याचे दिसून आले. मात्र, रेल्वे जवानांच्या हुशारीमुळे मोठी दुर्घटना टळली. कर्मचाऱयांनी वेळीच रेल्वेचे इंजिन बोगीपासून वेगळे केले, त्यामुळे दुसऱया बोगीला आग लागली नाही. तथापि, आगीच्या भडक्यामुळे इंजिन पूर्णपणे भस्मसात झाले आहे.