सावंतवाडी
कोकण रेल्वे आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी पुढील तीन महिन्यांसाठी अधिक तीव्र करणार आहे. तिकीट तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे . संपूर्ण मार्गावर अभिमानाने प्रवास करा,सन्मानाने प्रवास करा,तिकीट खरेदी करा आणि अभिमानाने प्रवास करा असे आवाहन कोकण रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आले आहे .
कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या सर्व ट्रेन्स मध्ये सातत्याने तिकीट तपासणी करून विना तिकीट प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांवर कारवाई केली जात असते.ऑगस्ट ते ऑक्टोबर या गेल्या तीन महिन्यात करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत14,150 विनातिकीट प्रवासी आढळून आले आहेत .त्यांच्या कडून 86लाख 67हजार 820रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ऑगस्ट 2023मध्ये 4,484 विनातिकीट प्रवाशांकडून26लाख67हजार555 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सप्टेंबर 2023मध्ये 4888 विनातिकीट प्रवाशांकडून27लाख09हजार700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तर ऑक्टोबर 2023मध्ये 4778 विनातिकीट प्रवाशांकडून32लाख60हजार565रुपयांचादंड वसूल करण्यात आला.यापुढे ही तिकीट तपासणी ची मोहीम कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर सुरू रहाणार आहे. प्रवाशांनी योग्य व वैध तिकीटासह प्रवास करावा असे आवाहन कोकण रेल्वे चे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी केले आहे.