प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ शिवशक्तीनगर येथील सिद्धिविनायक मंदिराचा 11 वा वर्धापनदिन रविवारी आहे. यानिमित्त शिवसाई सेवा संघ, शिवशक्तीनगर यांच्यावतीने रविवार दि. 12 व सोमवार दि. 13 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी 6 ते 9 मूर्तीपूजा व अभिषेक, 9 ते 11 गणहोम, दुपारी 12.30 वाजता महाआरती व प्रसाद, सायंकाळी 5 ते 7 सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार दि. 13 रोजी सकाळी 6 वा. काकड आरती, सकाळी 7 ते 9 पर्यंत अभिषेक, 9 ते 11 श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 12.30 ते 4 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाप्रसादानंतर भजन व रात्री 8 वाजता महाआरती व मंत्रपुष्पांजली असा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी व गावातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, शिवसाई सेवा संघ यांच्यावतीने करण्यात आले आहे.