4-5-2022 ते 10-5-2022 पर्यंत
साडेसातीचा बागुलबुवा (भाग 2ःसारांश)
नमस्कार, मागच्या आठवडय़ामध्ये आपण साडेसातीच्या प्रभावाबद्दल थोडी चर्चा केली. ज्योतिषशास्त्राच्या सगळय़ा पुस्तकांमध्ये शनी ग्रहाला ‘पापग्रह’ अशी संज्ञा दिलेली आहे. बरेच ज्योतिषीसुद्धा पापग्रह म्हणून उल्लेख करतात. जणू काही माणसाला त्रास देण्याकरताच हा ग्रह आहे! हा उल्लेख सपशेल चुकीचा आहे. कोणताही ग्रह हा पाप, क्रूर किंवा शुभग्रह असत नाही. आपण कळत-नकळत केलेल्या पापांना दाखवणारा ग्रह म्हणून त्याला पापग्रह असे संबोधन दिले जाते. समजा तुम्हाला ताप आला आहे आणि तुम्ही थर्मामीटरने ताप किती आहे हे मोजता आणि थर्मामीटर दाखवतो की तुम्हाला 102 ताप आहे. याचा अर्थ थर्मामीटरने तुम्हाला ताप दिला असा होतो का? नाही ना? तुमच्या शरीरात एखादा व्हायरस-विषाणू आहे आणि थर्मामीटर फक्त ते दाखवायचे काम करतो, इतकी साधी गोष्ट आहे. एखाद्या ग्रहाची शांती करणे म्हणजे ताप आला म्हणून थर्मामीटरची पूजा करण्यासारखे आहे. असो. साडेसातीमध्ये नक्की जाणवणारी काही लक्षणे आहेत. एक म्हणजे पैसा अनाठाई खर्च होतो. दुसरी गोष्ट म्हणजे नातेसंबंधांमध्ये दुरावा येतो, गैरसमज होतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे शरीराला (मुख्य म्हणजे पायांना) इजा होते. आता काही उपाय सांगतो, ज्यामुळे पूर्वी केलेल्या पापकर्मांचा आपण पश्चाताप करून साडेसातीचा काळ सुसह्य करू शकतोच पण त्यातून फायदाही उचलू शकतो. तुम्ही अनंतशयन लक्ष्मीनारायणाची मूर्ती बघितली असेल. श्रीविष्णू पहुडले आहेत आणि लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे. यामध्ये आपल्या ऋषीमुनींना एक गूढ रहस्य सांगायचे होते. हातामध्ये बृहस्पतीचा वास असतो आणि गुडघ्यामध्ये दैत्य गुरु शुक्राचार्यांचा वास असतो. हे दोन्ही ग्रह एकत्र आणण्यासाठी हे चित्र काढले गेले असावे. कालपुरुषाच्या दशम भावामध्ये मकर ही शनीची रास येते आणि हे दशम स्थान हे आपल्या वैवाहिक जोडीदाराचे सुख-स्थान आहे. आपल्या साडेसातीमध्ये आपल्या वैवाहिक जोडीदाराचे पाय चेपा! संपत्तीमध्ये कमी येणार नाही. कधीही शनिमहात्म्य वाचू नका. त्यामध्ये शनिपीडेचे इतके वर्णन आहे की त्यामुळे आपल्या अंतर्मनात सूचना जाऊन आपल्याला ते भोगावे लागू शकते. साडेसातीमध्ये जितके होता येईल तितके नम्र राहण्याचा प्रयत्न करा. शो-बाजी अजिबात नको! कोणत्याही गैरसमजाला थारा देऊ नका. कोणाचे पाय पकडण्याकरता लाज वाटून घेऊ नका. स्वच्छ रहा. निर्मळ रहा. खरे बोला. आणि चुका घडल्या तर त्याबद्दल माफी मागा. काही लोक मारुतीला शनीचा जाब म्हणून पाहतात. काहीअंशी हे खरे आहे. लोक साडेसातीमध्ये शनिवारी मारुतीचे दर्शन घेतात, खडेमीठ उडीद वाहतात. तेल वाहतात. काही लोकांचा असा गैरसमज आहे की शनी आणि मारुती एकच आहेत. हे साफ चुकीचे आहे. नोंद करण्याचा मुद्दा हा की जी तुमची रास असेल त्या राशीच्या स्वामीचा वार असेल त्यादिवशी मारुतीचे दर्शन घ्यावे. उदाहरणार्थ तुमची जर सिंह रास असेल तर त्या सिंह राशीचा मालक रवी आहे म्हणून रविवारी मारुतीचे दर्शन घ्यावे. साडेसातीमध्ये खजूर खाऊ नये. कोणालाही दुखवू नये. आपल्या हाताखालच्या माणसांचा कधीही अनादर करू नये. कष्टकऱयांना होईल तितकी मदत करावी. तुम्ही जर व्हाईट कॉलर जॉबमध्ये असाल तर शारीरिक त्रास होऊ नये म्हणून घाम गळेपर्यंत व्यायाम करा म्हणजे एका अर्थाने तुम्ही स्वतः शरीराला कष्ट देत आहात पण ते चांगल्याकरता!! (हे माझे बायपास लॉजिक आहे बरं का!) शरीर साथ देत असेल तर रक्तदान करा, अपघात टळतील! ज्या शनी मूर्तीला डोळे आहेत त्या मूर्तीचे समोरून दर्शन कधीही घेऊ नये. दर्शन घेताना आपली नजर कायम शनिदेवांच्या चरणांकडे असावी. मुक्मया प्राण्यांची सेवा करणे, कुत्र्यांना बिस्किट घालणे, पक्ष्यांकरता पाण्याची सोय करणे, कु÷रोग्यांना अन्नदान करणे, शनी मंत्राचा जप करणे, दशरथकृत शनिस्तोत्राचा पाठ करणे, पिंपळ वृक्षाखाली शनिवारी चौमुखी तेलाचा दिवा लावणे यानेही त्रास कमी होतो आणि उत्कर्ष साधतो. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट, हा काळ हा आत्मशुद्धीचा काळ आहे असे समजा. आपले कोण आणि परके कोण याची जाणीव करून देणारा काळ आहे, आर्थिक नियोजन कसे करावे हे शिकवणारा काळ आहे असे समजा. आत्मिक स्नानाची वेळ आहे असे समजा. नम्रता शिकवणारा काळ आहे हे जाणून घ्या आणि साडेसातीचा बागुलबुवा न करता स्वतःचा उत्कर्ष साधा.
महा उपायः दोन व्यक्तींना (भाऊ-बहीण, सासू-सून, नवरा-बायको, मित्र किंवा कोणीही दोन व्यक्ती) जर असे वाटत असेल की नाते तुटण्याच्या सीमेवर आहे आणि ते तुटू नये तर त्यांनी एकमेकांना वाढदिवसाच्या दिवशी स्फटिकाची माळ भेट द्यावी. नाते सुधारते.
छोटी वास्तू टिपः L शेप वास्तू असेल तर कोन असलेल्या जागी दार बसवून 2 भाग करावे.
मेष
आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्मयता आहे. धनप्राप्ती कष्टांनी होईल. प्रवासात नुकसानीची शक्मयता आहे. वाहन आणि स्थावर जमिनीचे सुख उत्तम मिळेल. प्रेम प्रसंगात निराशा होऊ शकते. नोकरदारांना चांगले दिवस आहेत. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. मान सन्मान प्राप्त होईल.
उपाय-पांढरे तीळ घालून चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावे.
वृषभ
भावाचे-बहिणीचे सहकार्य मिळेल. आरोग्याची चिंता राहील. प्रवास टाळावा. वृद्ध व्यक्तीशी भांडण होण्याची शक्मयता आहे. जमिनीचे व्यवहार टाळावेत. शेअर्समधून लाभ संभवतो. नोकरदारांना प्रमोशनचे योग आहेत. वैवाहिक जीवनात तणाव असेल. भाग्याची उत्तम साथ आहे. कर्तबगारीमध्ये वाढ होईल.
उपाय-दुपारी बारा ते एकच्या दरम्यान दत्त दर्शन घ्यावे.
मिथुन
वाढत्या गर्मीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. बाहेरील खाणे पिणे टाळावे. प्रवासाचे योग आहेत. घरच्यांची उत्तम साथ मिळेल. जमिनीचे व्यवहार फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीचे योग आहेत. प्रेम प्रसंगात यश मिळेल. छोटय़ा लाभाची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला वरि÷ांचा त्रास जाणवेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वाहन जपून चालवावे.
उपाय-शुक्रवारी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा.
कर्क
आरोग्याच्या समस्या दूर होतील. प्रवासात वस्तू गहाळ होण्याची शक्मयता आहे किंवा खर्च जास्त होईल. लेखन कामात यश मिळेल. जमिनीशी संबंधित व्यवहार यशस्वी होतील. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नये. पैशांची आवक ठीकठाक राहील. वैवाहिक जीवन सुमधूर असेल. गुप्त बातमी समजेल. दुखापतीची शक्मयता आहे. भाग्य उत्तम असेल.
उपाय-गुरुवारी केळीचे दान द्यावे.
सिंह
दोषयुक्त पाण्यामुळे तब्येतीच्या तक्रारी होतील. घरातील वातावरण चांगले असेल. पैशांची आवक उत्तम राहील. कामानिमित्त प्रवास घडू शकतो. भावंडांचे सहकार्य मिळेल. ज्ये÷ स्त्रीशी मतभेद होऊ शकतात. शेअर्समधून लाभ होईल. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. दूरच्या प्रवासाचे योग असले तरी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
उपाय- सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय करावी.
कन्या
बिघडलेली तब्येत सुधारेल. पैशांची आवक उत्तम असेल. घरात छोटेखानी समारंभ होऊ शकतो. प्रवास टाळावा. वाहन सुख उत्तम आहे. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस आहेत. वैवाहिक जीवन सुखमय असेल. कष्टाची तयारी ठेवावी. गुप्त शत्रू नाव बदनाम करण्याची शक्यता आहे. सावध असावे. लाभाचे योग बनत आहेत.
उपाय-गरजू व्यक्तीला वाहना ज्ञानदान द्याव्या
तूळ
तब्येतीची साथ राहील. घरामध्ये वाद होण्याची शक्मयता आहे. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रवास घडेल. जमिनीच्या वादांमध्ये यश मिळेल. वाहन खरेदीचे योग आहेत. छोटय़ा गुंतवणुकीतून मोठा लाभ होण्याची शक्मयता आहे. प्रेमप्रसंगात यश मिळेल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. आपले काम चोख करावे.
उपाय-बांधकाम मजुरांना ताक द्यावे
वृश्चिक
पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. घरात खेळीमेळीचे वातावरण असेल. प्रवासातून लाभ होईल. नवीन योजना बनवाल. वाहन सुख उत्तम असेल. आईचे सहकार्य मिळेल. प्रेमप्रसंगात मधुरता निर्माण होईल. नोकरदारांना कष्टाचा काळ आहे. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. भाग्याची उत्तम साथ मिळेल. लाभाच्या संधी मिळतील. लांबच्या ठिकाणाहून फायदा होईल.
उपाय-गाईला चपाती आणि गुळ खायला घाला.
धनु
इच्छित वस्तूची प्राप्ती होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रवासाचे चांगले योग बनत आहेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. जमीन आणि वाहन प्राप्तीचे योग आहेत. गुंतवणुकीतून फायदा होईल. गुप्तशत्रूंचा त्रास कमी होईल. चहाडी करणाऱयांची तोंडे बंद होतील. व्यवसायामध्ये नाव कमवाल. लाभाची शक्मयता जास्त आहे.
उपाय-मुक्मया जनावरांना खाणे द्यावे.
मकर
आरोग्य सुधारेल. पोटाच्या तक्रारी दूर होतील. कुटुंबातील वातावरण उत्तम असेल. दुसऱयांना मदत कराल. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रवास घडेल. प्रेमप्रसंगात निराशा होऊ शकते. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला कष्टाचे फळ कमी मिळेल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भाग्य साथ देईल. प्रति÷sमध्ये वाढ होईल.
उपाय-मुंग्यांना साखर घालावी
कुंभ
नवीन उत्साह जाणवेल. शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होईल. धनप्राप्ती सहजतेने होईल. जुनी येणी वसूल करण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रवास शक्मयतो टाळावा. ज्ये÷ व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. प्रेमप्रसंगात ताणतणाव येईल. धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकरवर्गाला उत्तम काळ आहे. वैवाहिक जोडीदाराशी भांडण संभवते. देवदर्शनाकरता प्रवास कराल.
उपाय-दिव्यांगाना आर्थिक मदत करावी.
मीन
पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल. आरोग्याची साथ मिळेल. कुटुंबात वाद विवाद संभवतात. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. जमिनीचे व्यवहार टाळावेत. प्रेमीजनांना उत्तम काळ आहे. नोकर वर्गाला कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. वैवाहिक जीवन मधुर असेल. वाहन जपून चालवा, दुखापतीची शक्मयता आहे. सगळय़ा प्रकारचे लाभ संभवतात.
उपाय- पिवळा हात रुमाल जवळ ठेवावा.