प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दि. 7 रोजी गोव्यात दाखल होत आहेत. प्रत्यक्षात ते काल शनिवारी गोव्यात येणार होते. परंतु शुक्रवारीच त्यांच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे ते आज दाखल होत आहेत. गोव्यात आल्यानंतर सर्वप्रथम ते आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दुपारी एकच्या सुमारास गोमेकॉत भेट देणार आहेत. सिंधुदुर्गमध्ये एका कार्यक्रमानिमित्त ते येणार असून दिल्लीतून गोवामार्गे सिंधुदुर्गात जाणार आहेत.