लखनौ
भाजपचे वरिष्ठ नेते सतीश महाना यांची उत्तरप्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे अभिनंदन करत सभागृहाला संबोधित केले. सतीश महाना हे आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाना यांनी कल्याणकारी कामे केल्यानेच जनतेकडून सातत्याने त्यांना पाठिंबा मिळत राहिला असल्याचे योगींनी म्हटले आहे. विरोधी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही महाना यांचे अभिनंदन केले आहे.