बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आयटी मंत्री डॉ. सी.एन. अश्वथनारायणा यांनी बुधवारी कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या २२ वैद्यकीय उपकरणांचे अनावरण केले.
कर्नाटक इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी सोसायटी (केआयटीएस) च्या वतीने बेंगळूर बायो-इनोव्हेशन सेंटर (बीबीसी) ने यापैकी सहा उत्पादने घेतली होती आणि कर्नाटक स्टार्टअप सेलने १६ उत्पादनांची निर्मिती केली आहे. अशी एकूण २१ उत्पादनांची निर्मिती केली असून त्यांचे अनावरण करण्यात आले आहे.
अश्वथनारायण यांनी आमची नाविन्यपूर्ण क्षमता पुन्हा एकदा सर्वांसमोर आणण्यासाठी आणि आमच्या कोरोना लढायला मदत केल्याबद्दल मी सर्व उत्पादकांचे अभिनंदन करतो. कर्नाटक स्टार्टअप सेलने कॉम्बॅट कोविड १९ आव्हान सुरू केले आणि ३ टप्प्यांत प्राप्त झालेल्या ३५६ अर्जांमधून ही उत्पादने निवडलीअसल्याचे ते म्हणले.