दहावीच्या निकालात मुलींचीच बाज, कोकण विभाग आघाडीवर, राज्याचा निकाल 95.30 टक्के
कोल्हापूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल 95.30 टक्के तर कोल्हापूर विभागाचा निकाल 97.64 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 98.77 टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
गुरुवारपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान, तर छायाप्रतींसाठी 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
www.mahresult.nic.in (येथे निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल)
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.mahahsscboard.in (येथे शाळांना एकत्रित निकाल मिळेल)
या ऑनलाइन वेबसाइट्सवर निकाल उपलब्ध