गुवाहाटी
येथील आयआयटीमध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये एका प्राध्यापकासह 50 हून अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या 6 दिवसांच्या चाचणीत ही प्रकरणे आढळून आली आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने बाधित लोक आल्यानंतर कॅम्पसमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. पुढील काही दिवस आयआयटी कॅम्पस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच सध्या पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांपैकी कोणाचीही प्रकृती अतिगंभीर नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.