नवी दिल्ली
कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार हे नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील चौकशीसाठी पुन्हा एकदा सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहिले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने शिवकुमार यांचा जबाब नोंदविण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. पीएमएलए अंतर्गत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. चौकशीसाठी यंत्रणेकडून मागविण्यात आलेले सर्व दस्तऐवज सोपविले आहेत अशी माहिती शिवकुमार यांनी दिली आहे. ईडीने यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात शिवकुमार यांची चौकशी केली होती.