साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळ बेळगाव जिल्हा यांच्यावतीने दि. 14 एप्रिल रोजी 130 वी आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे यंदा मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मिरवणूक होणार नाही. तसेच आंबेडकर जयंती गल्लो-गल्ली साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.