प्रतिनिधी /पणजी
मये मतदार संघातील भाजपचे माजी आमदार अनंत शेट यांचे बंधू पेमेंद्र शेट यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह काल सोमवारी भाजपात पूनर प्रवेश केला आहे. भाजप पक्ष समिती ज्या कार्याची जबाबदारी माझाकडे देईल ती जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडणार असल्याचे प्रेमेंद्र यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेमेंद्र शेट यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. प्रेमेंद्र शेट यांच्या सह मये मतदार संघातील दोन्ही जिल्हा पंचायत सदस्य तसेच अनेक पंचायतींचे सरपंच उपसरपंच व पंच सदस्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रेमेंद्र शेट यांचे स्वगत करतांना म्हणाले की. भाजप सरकारच्या काळात गोव्याचा झपाटय़ाने विकास होत आहे. गोव्यात स्थिर सरकार देणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. म्हणून आज गोव्यात मोठय़ा प्रमाणात लोक भाजपात प्रवेश करीत आहेत. गोव्याच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपात येणाऱया सर्वांचे स्वागत आहे. निवडणूका जवळ येत आहेत तसे गोव्यात अनेक पक्ष गोव्यात येत आहेत. हे पक्ष म्हणजे तात्पूरता परवाना मिळालेली दुकाने असून निवडणूका झाल्या की ही दुकाने बंद करून दिल्लीवाले दिल्लीत तर पच्छिम बंगालवाले पच्छिम बंगाला जातील. गोव्याचा खऱया अर्थाने विकास करण्यासाठी डबल इंजीनचे सरकार महत्वाचे. केंद्रात मोदी सरकार तर गोव्यात भाजप सरकार असणे गरजेचे आहे. येत्या निवडणूकीतही भाजपच बहूमताने सत्तेवर येईल यात शंकाच नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनीही मगो, आप आणि तृणमूल या पक्षावर टिकास्त्र सोडीत आज काँग्रेसची हालत दुचाकी वाहना झाली अससल्याचे सांगितले. उमेदवारी जाहिर करूनही काँग्रेसचे आमदार काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत त्यामुळे काँग्रेस गोव्यातून हद्दपार झाल्यात जामा आहे. मगो आणि तृणमूलची युती ही अनैसर्गिक युती आहे. पच्छिम बंगालमध्ये लोकशाही रसातळाला पोचली असून गोव्यातही तोच कित्ता गिरवायला गोमंतकीय देणार नाही त्यामुळे तृणमूलच्या नादाला लागलेल्या मगो संपूष्टात येईल त्या काळचा मगो पक्ष हा गोमंतकीयांचा होता आजचा मगो पक्ष हा ढवळीकर प्रावेट लिमिटेट बनलेला आहे असेही तानावडे म्हणाले. प्रेमेंद्र शेट हे पूर्वी भाजपचे कार्यकर्ते. नंतरच्या काळात काही प्रमाणात मतभेद झाल्यामुळे प्रेमेंद्र शेट आणि त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्त्ये भाजपापासून दुरावले होते. विधानसभा निवडणूका जवळ आल्या असता मगोने या सर्वांना आपल्या पक्षात ओढले होते. मगोने जे बारा उमेदवार निच्छित केले होते त्यात प्रेमेंद्र शेट यांचा समावेश होता. ऐनवेळी प्रेमेंद्र शेट यांनी भाजपात पूनर प्रवेश केल्याने मगोला मोठा धक्का बसला आहे. मगोने तृणमूलशी युती केल्यामुळे मगोचे मोठय़ाप्रमाणात कार्यकर्ते नाराज झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून प्रेमेंद्र शेट पुन्हा भाजपात दाखल झाले आहेत.