बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात सहा कावळे मृतावस्थेत सापडले आणि देशातील अनेक भागात एव्हीयन इन्फ्लूएन्झा विषाणूचा प्रसार सुरु झाला आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, विषाणूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला की नाही हे तपासण्यासाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यात सहा कावळ्यांचा मृत्यू झाला असून, नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बर्ड फ्लू रोखण्यासाठी सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, ‘असे कर्नाटक राज्याचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले.
दक्षिणा कन्नड जिल्हा केरळच्या सीमेवर असून कोट्टायम आणि आलाप्पुझा या दोन जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असल्याचे जाहीर केले आहे. कर्नाटकने बुधवारी चार सीमावर्ती जिल्ह्यांना हाय अलर्टजरी केला आहे.
कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्या शेजारी असणाऱ्या केरळ राज्यात सध्या बर्ड फ्लूचा प्रसार सुरू झाला आहे. दरम्यान शेजारी असणाऱ्या कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांनी खबरदारी म्हणून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.