माई हुंडाईचा सामाजिक उपक्रम, बहिणीची राखी होणार घरपोच
प्रतिनिधी/कोल्हापूर
सध्या बरेच दिवस कोरोना संसर्गामुळे प्रत्येकाला घरातच बसून कार्यालयीन, व्यावसायिक कामकाज चालू आहे. यामुळे आजपर्यंतचे सर्व सण, उत्सव,वाढदिवस घरातच साजरे झाले. परंतु बहिण-भावाची प्रितीची नाळ घट्ट धरणारा रक्षाबंधन उत्सव बहिण भावाच्या भेटीशिवाय व राखीच्या अमूल्य धाग्याविना अपूराच म्हणावा लागेल. परंतु या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी कोल्हापूरातील ‘माय हुंडाई’ या नामांकित समूहाचे कर्मचारी प्रशासनाचे नियमांचे पालन करुन स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत.बहिण भावाच्या या प्रेमाला सुंदर किनार देणार फक्त एक व्हॉटसअॅप नंबर.
सध्या सोशल मिडियावर या संदेशाने सामाजिक बांधिलकीची एक जबाबदारी स्विकारली आहे.8380012421 या व्हॉटसअॅप मोबाईल नंबरवर आपल्या भावाचा रहिवाशी पत्ता बहिणीने पाठवावा, या पत्त्यावर माय हय़ुंडाईचे भाऊ या बहिणीची राखी या पत्त्यावर तेवढय़ाच प्रेमाने घरपोच करणार. आपणही या समाजाचे काहीतरी देणे लागतो याच भावनेने चालू केलेल्या या उपक्रमास अनेक भगिनींनीदेखील चांगला प्रतिसाद दिला आहे.
कोल्हापूर जिल्हय़ात ‘माय हय़ुंडाई’ समूहाचे व्यावसायिक साखळी सर्वत्र पसरली आहे. याचाच आधार घेऊन ही बहिणीची राखी निःशुल्क पण अमूल्य प्रेमाच्या धाग्याची घरपोच करण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.
माई हय़ुंडाई समूहाचे जनरल मॅनेजर विशाल वडेर यांना सुचलेल्या या कल्पनेतून जेंव्हा प्रत्यक्ष उपक्रमास सुरुवात झाली. त्यावेळी अल्पावधीतच पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, बेळगाव अशा विविध भागातील भगिनींनीही ही प्रेमाची अमूल्य जबाबदारी माई हय़ुंडाई समूहाकडे मोठय़ा विश्वासाने भावाचा फक्त पत्ता देऊन सुपूर्द केली. आपल्या भावाकडे हा राखीचा धागा पोहोच करताना असे एक एक छायाचित्र तेवढयाच विश्वासाने पुन्हा त्या बहिणीला पाठविणेची व्यवस्था या उपक्रमात आहे. रक्षाबंधनच्या या सणात आपली राखी आपल्या भावापर्यंत पोहोचली या छायाचित्रापेक्षा कोणतीही मोठी ओवाळणी या प्रेमापुढे नक्कीच फिकी पडणार. या उपक्रमाचे समाजाकडूनही चांगले कौतुक होत आहे.
अनेक भगिनींनी प्रशासनाच्या, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱया या नियमांमुळे प्रत्यक्ष आपल्या भावापर्यंत पोहोचणे अशक्मय आहे. परंतु त्यांच्या या आनंदावर त्याचा काहीही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केला. ‘माई हुंडाई’ समुहावर आमच्या ग्राहकांचा असणाऱया विश्वासावरच याला अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळाला. शेकडो किलोमीटर दूर असणाऱया भगिनींनी ही जबाबदारी विश्वासाने आमच्यावर सोपविली त्या भावा-बहिणीच्या प्रेमाची वीण घट्ट करण्याची एक सामाजिक बांधिलकी ‘माई हुंडाई’ समूह मोठय़ा आनंदाने स्विकारत आहे. –तेज घाटगे,मॅनेजिंग डायरेक्टर