प्रतिनिधी / रत्नागिरी
मनोरुग्ण महिलेने घरानजीक असणाऱया विहिरीमध्ये उडी मारल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.15 च्या सुमारास घडल़ी या घटनेमध्ये मनोरुग्ण महिलेचे निधन झाल़े या प्रकरणीची खबर अंकुश रामचंद्र पिलणकर (80 ऱा पोमेंडी खुर्द, रत्नागिरी) यांनी दिल़ी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खबर देणाऱयाची पत्नी अल्पना अंकुश पिलणकर (60 ऱा पोमेंडी खुर्द, रत्नागिरी) या मानसिक रुग्ण होत्य़ा त्यांच्यावर मनोरुग्णालयामध्ये रत्नागिरी येथे उपचार देखील सुरु होत़े दरम्यान मंगळवारी मृत अल्पना या घरात कोठेही दिसल्या नाहीत़ आजूबाजूला शोध घेतला असता नजीकच्या विहिरीमध्ये अल्पना यांचा मृतदेह आढळल़ा या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े