प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी विक्रांत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या बैठकीत निवड करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांची नियुक्ती केली आहे.
उपाध्यक्षांच्या अधिकारात असलेले कृषी व पशुसंवर्धन हा स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. या विभागाच्या सभापती पदी दापोलीच्या रेशमा झगडे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आजच्या निवडणूक प्रक्रियेनंतर अधिकृत अध्यक्ष सभापती याची नावे जाहीर होणार आहेत.
आजच्या निवडीचा तपशील पुढील प्रमाणे अध्यक्ष विक्रांत भास्करराव जाधव (गुहागर), उपाध्यक्ष व बांधकाम व आरोग्य सभापती उदय बने (रत्नागिरी), तसेच शिक्षण सभापती चंद्रकांत मंचेकर (लांजा), महिला व बालकल्याण समिती सभापती भारती सरवणकर (राजापूर) , समाज कल्याण सभापतीपदी परशुराम कदम ( रत्नागिरी) कृषी व पशुसंवर्धन-रेश्मा झगडे(दापोली) तर स्थायी समिती मध्ये सदस्य महेश उर्फ बाबू म्हाप, रोहन बने, अण्णा कदम, स्वप्नाली पाटणे यांची निवड करण्यात आली आहे.