ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आज कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या आणि सरकारला वेठीस धरण्याच्या रणनीतीवर दोन्ही नेते चर्चा करतील. दुपारी 3 वाजता होणाऱ्या या बैठकीत कृषी, आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यावरही चर्चा होणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये दर महिन्याला जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमवेत होत असलेल्या शेतकरी बैठकीचा उल्लेख करून टिकैत म्हणाले, टिकैत म्हणाले, बंगाल सरकारने राज्यातील शेतकऱ्यांशी नियमितपणे संवाद साधला पाहिजे. तसेच हे धोरण देशभरात लागू असले पाहिजे.